‘फिरते व स्थायी’ पथक प्रमुखांना निवडणूक कालावधीत विशेष अधिकार
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका):- लोकसभा निवडणूक कालावधीत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थायी व फिरते पथकांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. ही पथके जिल्ह्यातील १०४- सिल्लोड, १०५- कन्नड, १०६- फुलंब्री, १०७-औरंगाबाद मध्य, १०८- औरंगाबाद पश्चिम, १०९- औरंगाबाद पूर्व, ११० –पैठण, १११- गंगापूर, ११२- वैजापूर या विधानसभा मतदारसंघ निहाय स्थापित करण्यात आली आहेत. या पथकाच्या प्रमुखांना निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून म्हणजेच दि.१६ मार्च पासून ते दि.६ जून २०२४ पर्यंतच्या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १२९, १३३, १४३ व १४४ अन्वये विशेष अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रदान केले आहेत. जिल्ह्यात तब्बल २२६ पथके नियुक्त असून त्या पथकांचे प्रमुखांना हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, असे आदेशात नमूद आहे.
Comments
Post a Comment