४०० क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण : निवडणूक प्रक्रिया बिनचूक होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 




छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):-  निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ४०० क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी राठोड, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच जिल्हाभरातील ४०० क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की. मतदान प्रक्रिया विनाअडथळा पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. मतदान यंत्र, कंट्रोल युनिट, व्हिव्हीपॅट या यंत्रांची जोडणी, योग्य तपासणी व हाताळणी योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. ह्यासाठी प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाद्वारे सर्व प्रक्रिया समजून घ्यावी. या दरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येणाऱ्या अडचणींचे आकलन करुन त्यादूर करुन ऐनवेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर जाण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनाचाच वापर करणे बंधनकारक आहे. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी अहवाल देण्याची जबाबदारी पार पाडावी. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या केंद्रावर पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत सखोल माहिती करुन घ्यावी व आपले काम चोख पणे पार पाडावे. या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी होईल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.

 उपविभागीय अधिकारी राठोड यांनी सादरीकरण करुन व्हीव्हीपॅट, मतदान यंत्र, कंट्रोल युनिट वापर व हाताळणीबाबत प्रशिक्षण दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा