वाहन व्यवस्थेची सज्जता ठेवा- उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका):- निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील शासकीय वाहन व्यवस्थेतील वाहने अधिग्रहित करुन आवश्यकतेनुसार वाहन व्यवस्थेची सज्जता करावी,असे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी आज वाहतुक व्यवस्थेचा आढावा घेतांना दिले.
लोकसभा निवडणूकीसाठी
जिल्हा प्रशासनाला लागणाऱ्या वाहनांचा आढावा आज घेण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी
देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, वाहतुक व्यवस्थेचे नोडल अधिकारी
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे,
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड,
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. आर. के. श्रीवास्तव, डॉ. एस. ए. सोनवणे, सहा.
मोटार वाहन निरीक्षक संदीप शेलार, अमित लखपती तसेच सर्व निरीक्षक उपस्थित होते.
वाहतुक व्यवस्था कक्षाचा
आढावा यावेळी घेण्यात आला. निवडणूक कामकाजासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर लागणाऱ्या वाहनांची
आवश्यकता तपासून त्यानुसार वाहने उपलब्ध करणे. त्यासाठी आवश्यक ती वाहने अधिग्रहित
करणे, विधानसभा मतदारसंघनिहाय वाहनांचे वितरण
करणे, सर्व अधिग्रहित वाहनांची स्थिती तपासणे,
आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर पुरवठादाराकडून वाहने उपलब्ध करणे, जिल्ह्याचा वाहतुक
आराखडा तयार करणे, मतदान यंत्रे व निवडणूक साहित्य वाहतुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार
सुरक्षित व जीपीएस यंत्रणेसहित वाहने सज्ज
ठेवणे इ. बाबतीत आढावा घेण्यात आला.
निवडणूक कालावधीत
जिल्ह्यात ५५८ जीप, ३६३ बस गाड्या, ३६ मिनी बस, २७९ क्रुजर वा तत्सम वाहने, ३४ कंटेनर
अशी तब्बल १२७० वाहने लागणार आहेत. त्यादृष्टिने
आधी शासकीय वाहने अधिग्रहित करणे, त्यात सध्याच निवडणूक कामात वापरात असलेली व सध्या
वापरात नसलेली अशी वाहने यांची माहिती एकत्रित करुन वापरात नसलेली वाहने अधिग्रहीत
करण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी व वाहन व्यवस्था सज्ज ठेवावी. प्रत्यक्ष निवडणूकीच्या
वेळी वाहनांची आवश्यकता वाढते. त्यादृष्टीने नियोजन करावे,असेही निर्देश देण्यात आले.
०००००
Comments
Post a Comment