विविध विकास कामांचा आढावा: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्पबाधीत उर्वरित शेतकऱ्यांना मावेजा वाटप करा- पालकमंत्री संदीपान भुमरे


छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):-
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान , ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प, जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा आज राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनधारक शेतकऱ्यांपैकी उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा वाटप करावा,असे निर्देशही पालकमंत्री भुमरे यांनी या बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उप जिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सुचिता शिंदे, कार्यकारी अभियंता सब्बीनवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे किरण पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, पैठण नगरपालिका मुख्याधिकारी आटोळे, जलसंधारण विभगाचे  आशिष चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बोर्डे, महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश कलंत्री यांच्यासह ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्पातील बाधित गावातील शेतकरी या बैठकीस उपस्थित होते.

 सिंचन प्रकल्पाअंतर्गत शासनाने संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा त्वरित वितरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी केले.  मावेजा द्यावयाच्या उर्वरित शेतकऱ्यांना दि.७ रोजी धनादेश वाटप करावे,असे त्यांनी सांगितले. यावेळी जलजीवन मिशन, नगर विकास विभागाच्या अंतर्गत भुयारी गटार विकास योजना आणि पैठण  येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या  कामाविषयीचा आढावा घेण्यात आला. त्रुटी राहिलेल्या मावेजा  प्रकरणात प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी,असे निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी या बैठकीत दिले.

ज्ञानेश्वर उद्यानातील उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी , महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या अतिरिक्त पाणी पुरवठाबाबत योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भातले नियोजन करावे. नगर विकास विभागाने शहरात हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा