टपाली मतदान प्रक्रियेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- निवडणूक,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच विशेष मतदार जसे ज्येष्ठ, दिव्यांग यांना टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. ही मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी  सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्यास्तरावर सुक्ष्म नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

लोकसभा निवडणूकीत टपाली मतदानाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.

टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी- कर्मचारी, वय वर्षे ८५ पेक्षा अधिकचे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यापैकी टपाली मतदानाची  इच्छा दर्शविणारे, त्यांच्या नोंदी व त्यांना टपाली मतपत्रिकांची उपलब्धता करणे, त्यांच्यासाठी मतदान करण्यासाठीचे वेळापत्रक व सुविधांची उपलब्धता करणे इ. बाबत सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर कुठं जाणार यावर त्यांच्या टपाली मतदानाच्या पर्यायाची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून ही प्रक्रिया राबवावी,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा