१९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघः आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन ;नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका):-‘लोकसभा निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगासंदर्भात निदर्शनास आलेल्या बाबींसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी सुविधाही करण्यात आली असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी कळविले आहे.
आचारसंहिता कक्षाशी नागरिकांना खालील संपर्क माध्यमातून
संपर्क साधता येईल.
१)
टोल फ्री क्रमांक- १९५०
२)
दुरध्वनी
क्रमांक ०२४-२९९९१८५८
३)
ई-मेल-
mccaurangabad2024@gmail.com
आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास
आल्यास नागरिकांनी वरील संपर्क माध्यमांचा वापर करुन आचारसंहिता कक्षाकडे आपली तक्रार
नोंदवावी. या शिवाय जिल्ह्यात सर्वत्र स्थिर सर्व्हेक्षण पथके. फिरते सर्व्हेक्षण पथके,
व्हिडीओ सर्व्हेक्षण पथके व व्हिडीओ तपासणी
पथके स्थापित करण्यात आली आहेत. नागरिकांनी वरील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात
आले आहे.
०००००
Comments
Post a Comment