'दिलखुलास' कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शनिवारी (दि.१३) व सोमवारी (दि.१५) मुलाखत


मुंबई, दि,१० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात 'लोकसभा निवडणूक २०२४' या विषयी छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शनिवार दि.१३ एप्रिल २०२४ रोजी आणि सोमवार दिनांक दि.१५ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

     आदर्श आचारसंहिता,निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली सर्व कार्यवाही, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था   कार्यवाही, मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याविषयी सविस्तर  माहिती 'दिलखुलास' कार्यक्रमातून श्री.स्वामी यांनी  दिली आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा