जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेची रंगित तालीम

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका):- लोकसभा २०२४ साठी जिल्ह्यात चवथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी दि.१८ पासून कार्यक्रम सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वात प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक काम अचूक आणि विहित वेळेत व्हावे यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. दि.१८ पासून नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन दाखल प्रक्रियेची रंगित तालीम घेण्यात आली.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणापासून ते अर्ज घेणे, ते सुविधा कक्षात अर्ज भरणे, आवश्यक कागद पत्रांची जोडणी करणे. त्यानंतर अनामत रक्कम भरणा करणे, अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे, शपथ घेणे इ. सर्व टप्पे करण्याट आले. त्यासाठी लागणारे सर्व संगणकीकृत नमुने, त्याच्या प्रति. कागद पत्रे, मतदार यादी, त्यातील क्रमांक शोधणे असे सर्व टप्पे बारकाईने करुन नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची तयारी तपासण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, प्रभोदय मुळे, व्यंकट राठोड तसेच संबंधित कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा