आचारसंहिता व मिडिया कक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट व पाहणी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२ (जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी  १९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्ष, मिडिया कक्षास  आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली.

सुटीच्या दिवशी सुरु असलेल्या या कक्षांचे कामकाज जिल्हाधिकारी स्वामी यांनी अकस्मात भेट देऊन पाहिले. सी व्हिजिल ॲप वर येणाऱ्या तक्रारी, त्यांच्या होणाऱ्या नोंदी, त्याबाबत होणारी कारवाई याबाबतची  प्रक्रिया त्यांनी पाहिली. शिवाय नागरिकांकडून दुरध्वनीवर येणाऱ्या तक्रारी यांची नोंद, दुरध्वनी कार्यान्वित असल्याबाबत स्वतः कॉल करुन खात्री केली.

त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात येत असलेल्या मिडीया कक्षाची पाहणी केली. तेथे बसविण्यात आलेले दुरचित्रवाणी संच, त्यावर होणारे वृत्त वाहिन्यांचे मॉनिटरींग, नोंदी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वृत्तपत्रांची कात्रणे, त्यांच्या नोंदी याबाबतची माहिती देण्यात आली. त्याशिवाय मिडिया कक्ष अधिक सुसज्ज व सुटसुटीत करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा