मार्च २०२४ अखेर मनुष्यबळ त्रैमासिक विवरण सादर करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांच्या कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक संख्येने काम करणाऱ्या सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र सादर करणे बंधनकारक आहे.  सेवायोजन कार्यालये (रिक्त पदाची सुचना देणे सक्तिचे) कायदा १९५९ व त्याअंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणपत्र ई- आर१ माहे मार्च २०२४ तिमाहि संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत  (३० एप्रिल २०२४ पर्यंत)  सादर करणे बंधनकारक आहे.

हे विवरणपत्र ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे.  त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in  हे संकेतस्थळ सुरु करुन  नियोक्त्यांच्या लॉग इन मध्ये लिस्ट अ जॉब वर क्लिक करावे.  नियोक्त्यांनी आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ई-आर रिपोर्ट  मधील ई आर-१ या ऑप्शनवर क्लिक  करुन ऑनलाईन सादर करावे. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास  किंवा अधिकच्या सहाय्यासाठी  सोमवार ते शुक्रवार सार्वजनिक सुट्या वगळून  सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत  ०२४०-२९५४८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही माहिती ३० एप्रिल २०२४ पूर्वी वेबसाईटवर ऑनलाईन भरणे बंधनकारक असून न भरल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते असे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा