संवेदनशीलता आणि समन्वयाने हाताळा कायदा सुव्यवस्था-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी




छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):-
लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था स्थिती संवेदनशीलतेने तसेच समन्वयाने हाताळा,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

            लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व उपविभागीय, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपायुक्त नितीन बगाडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आदी मुख्यालयातून उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे उपविभागीय तसेच तालुकास्तरीय महसूल व पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

            निवडणूकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करणे, आगामी काळात निवडणूक कार्यातील विविध टप्प्यांवर लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संपर्क नियोजन तयार करणे, वाहतुक नियोजन तयार करणे याबाबत आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी संयुक्त निर्णय घेण्यासाठी परस्पर समन्वय आवश्यक आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून कायदा सुव्यवस्था हाताळताना कोणतेही प्रकरण संवेदनशीलतेने हाताळा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा