‘पेन्शन आता ई- कुबेर मार्फत’; पेन्शधारकांनी खाते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावे- कोषागार विभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- सेवानिवृत्त वेतनधारकांचे सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) हे आता शासनाच्या ई- कुबेर प्रणालीद्वारे रिझर्व बॅंकेमार्फत पेन्शनधारकांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. तथापि, त्यासाठी पेन्शनधारकांनी आपले बॅंक खाते परस्पर न बदलता ते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावे,असे आवाहन वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्या सहा. संचालक श्रीमती सुषमा बुरकुले यांनी केले आहे.
यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे की, पेन्शनधारकांनी आपली पेन्शन
जमा होण्यासाठी ज्या बॅंकेत खाते सुरु केले असेल त्या खात्यात आय.एफ.एस.सी. कोड नुसारच
पेन्शन जमा होणार आहे. तथापि, काही पेन्शनधारक हे कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता बॅंक खाते
हे परस्पर अथवा अन्य जिल्ह्यात वा बॅंकेत बदलवून घेतात. तरी पेन्शधारकांनी आपले खाते ज्या मुळ बॅंकेत होते
त्याच बॅंकेत ठेवावे. परस्पर बदल करुन पेन्शन
बाबत अडचण निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी
जबाबदारी ही त्या पेन्शनधारकाची असेल. मार्च महिन्याचे मासिक पेन्शन हे दि. ५ एप्रिल
पर्यंत जमा होईल,असेही श्रीमती बुरकुले यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment