महिलाच करतील महिला मतदारांमध्ये जनजागृती ; ‘स्वीप’ उपक्रमांमध्ये बचतगटांना सहभागी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- महिलांचे आपापसातील संपर्क, स्थानिक संबंधांमुळे निर्माण झालेला परस्पर विश्वास यामुळे महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामिण व शहरी भागातही महिला बचत गटांच्या महिलांना मतदान जनजागृती उपक्रमात (स्वीप) सहभागी करुन घ्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 महिला बचत गटांतील महिलांना स्वीप उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अशोक सिरसे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे तसेच अन्य अधिकारी याबैठकीस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी असलेली उदासिनता दुर करणे, मतदानाचे महत्त्व पटवून सांगणे, मतदान केंद्रावरील सुविधांबाबत माहिती देणे इ. गोष्टी ह्या महिलांमधील स्वाभाविक संवादाद्वारे झाल्यास त्या अधिक प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे बचत गटांचे संघटन जे ‘उमेद’ सारख्या उपक्रमांद्वारे झालेले आहे. त्याचे जाळे गावागावांत त्याचा प्रभावी वापर करावा,असेही त्यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा