१०९ औरंगाबादपूर्व मतदार संघातील स्वीप उपक्रम: २५० हून अधिक सायकलस्वारांनी केली मतदार जनजागृती

 







छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- १०९ औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आज सकाळी २५० हून अधिक सायकलस्वारांनी मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे यावेळी आवर्जून उपस्थित होते. मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रमाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार रमेश मुंडलोढ, पल्लवी लिगदे, १०९ पूर्व मतदारसंघाचे SVEEP पथक सीताराम पवार,  सायकल पटू विजय पाटोदी, विजय गवळी तसेच जिल्हा सायकल संघटना निखिल काचेश्वर चरणजीत सांगा, सायकलिस्ट फाउंडेशन, डॉक्टर विजय व्यवहारे जैन सायकलिस्ट ग्रुप, सचिन कासलीवाल अमित कासलीवाल फिटनेस ग्रुप,  रमेश अवचार तेजस्विनी सायलिस्ट ग्रुप,  नीता गंगावणे देवगिरी सायकल्स क्लब,  चांगदेव माने व इतर स्वयंसेवी आरोग्य संघटनांची व सायकलस्वार संघटनांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते या सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.  या रॅलीच्या निमित्त जिल्हाधिकारी स्वामी यांनी आवाहन केले की, दि.१३ मे रोजी लोकांनी  मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे.  ही सायकल रॅली राजा बाजार -रोशन गेट -आजा चौक बळीराम पाटील स्कूल -आंबेडकर चौक -सिडको बस स्टँड - प्रोझोन मॉल -चिकलठाणा-नारेगाव या मार्गाने जनजागृती करत गेली. प्रोजोन मॉल येथे रॅलीचा समारोप झाला.  प्रोझोन मॉल व पाम हॉटेल यांनी या रॅलीसाठी सहयोग दिला. सहभागी नागरिकात ६ वर्षांचा अनय जैन ते ७५ वर्षांचे मोहन उन्हाळे यांचा तसेच महिला सायकलस्वारांचा सहभागही लक्षणीय होता.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा