राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी व सीडीएस परीक्षा बैठक व्यवस्था
छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका):- संघ लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी व सीडीएस परीक्षा रविवार दि.२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा अनुक्रमे दोन व तीन सत्रात होणार आहे. जिल्ह्यात २१ परीक्षा उपकेंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली असून ६४५० उमेदवारांना परीक्षा देण्याचे नियोजन करण्यात आले असून १०६७ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे,असे जिल्हा पर्यवेक्षकीय समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.
राष्ट्रीयसंरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा
रविवार दि.२१ रोजी प्रथम सत्र सकाळी १० ते साडे १२ व दुसरे सत्र दुपारी २ ते साडेचार
या कालावधीत १८ शाळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तर सीडीएस परीक्षा पहिले सत्र सकाळी ९ ते ११ व दुसरे सत्र १२ ते २
व तिसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळात एकून ३ शाळा महाविद्यालयात अशा एकूण २१ परीक्षा केंद्रावर होणार आहे.
परीक्षा केंद्रांची यादी याप्रमाणे-
1. शासकीय महाविद्यालय, आर्टस आणि विज्ञान,
बैठक क्र. 3800001 ते 3800384
2. मौलान आझाद महाविद्यालय, आर्टस, विज्ञान व
वाणिज्य डॉ.र फेकि झकेरिया कॅम्पस बैठक क्र. 3800385 ते 3800661
3. मौलान आझाद महाविद्यालय, आर्टस, विज्ञान व
वाणिज्य डॉ.र फेकि झकेरिया कॅम्पस बैठक क्र. 3800662 ते 3801102
4. डॉ.रफिक झकेरिया(महिला) महाविद्यालय,
ज्युबली पार्क बैठक क्र. 3840001 ते 3840384
5. विवेकानंद आर्टस आणि सरदार दिलीपसिंग
वाणिज्य महाविद्यालय, बैठक क्र. 3840385 ते 3840672
6. विवेकांनद विज्ञान महाविद्यालय, बैठक क्र.
3840673 ते 3840960
7. शिशु विहार हायस्कूल, बैठक क्र. 3840961
ते 3841248
8. बळीराम पाटील विद्यालय बैठक क्र. 3841249
ते 3841536
9. श्रीमती वेणुताई चव्हाण कन्या प्रशाला,
बैठक क्र. 3841537 ते 3841824
10. मिलिंद विज्ञान महाविद्यालय, बैठक क्र.
3841825 ते 3842112
11. हॉली क्रास मराठी हायस्कूल बैठक क्र.
3842113 ते 3842112
12. माणिकचंद पहाडे लॉ महाविद्यालय बैठक क्र.
3842401 ते 3842592
13. वसंतराव नाईक महाविद्यालय, बैठक क्र.
3842593 ते 3842880
14. शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको, बैठक क्र.
3842881 ते 3843360
15. मिलिंद कला महाविद्यालय, बैठक क्र.
3843361 ते 3843648
16. डॉ.सौ.इंद्राबाई भास्करराव पाठक महिला कला
महाविद्यालय, बैठक क्र. 3843649 ते 3843936
17. हॉली क्रॉस इंग्लिश हायस्कूल, बैठक क्र.
3843937 ते 3844224
18. मराठवाडा
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हायस्कूल आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बैठक क्र. 3844225 ते 3844512
19. केंद्रीय विद्यालय, बैठक क्र. 3844513 ते
3844896
20. शासकीय
पॉलिटेक्निक, बैठक क्र. 3844897 ते 3845173
21. धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालय, बैठक क्र. 3845174 ते 3845348
परीक्षार्थींसाठी
सुचनाः-
परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा
पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड,
स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात
उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकीत
प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.
तसेच डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम
संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे.
आयोगाकडून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे
वितरीत करण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र
हे त्यांच्या प्रवासाचा पास म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी
प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment