मतमोजणी केंद्रावरील सुविधा निर्मितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि.२ (जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी केंद्र व तेथे निर्माण करावयाच्या सुविधा निर्मितीचा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला.
‘महावितरण’चे सह व्यवस्थापकीय संचालक
राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र
कटके, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, अपर आयुक्त रणजीत पाटील, मुख्य अभियंता बढे,
कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, कार्यकारी अभियंता विद्युत अनघा पुराणिक, अग्निशमन
अधिकारी आर. के. सुरे, विज वितरण कंपनी प्रेमसिंग राजपूत तसेच सर्व संबंधित
अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित मतदान केंद्रावर मतमोजणी साठी
लागणारे कक्ष, तेथे त्यादिवशी उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख़्या, तेथे येणारी वाहने,
आवश्यक वीज पुरवठा, सुरक्षा यंत्रणा,अग्निशमन यंत्रणा इ. सर्व व्यवस्थांबाबत सादरीकरण
करण्यात आले. मतदान यंत्रे ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रुम, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही
यंत्रणा इ. उपलब्धतेबाबत व त्याच्या रचनेची सादरीकरणाद्वारे माहिती सादर करण्यात आली.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने आवश्यक त्या
उपाययोजना कराव्या. तसेच सुरक्षा यंत्रणा, संदेशवहन यंत्रणा, इंटरनेट इ.ची सुव्यवस्थित
उपलब्धता करावी. सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने आवश्यक मानकांचे पालन कटाक्षाने
करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांना दिले.
०००००
Comments
Post a Comment