‘स्वीप’उपक्रमांची व्याप्ती वाढवावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):- जिल्ह्यात चवथ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. हा कालावधी जवळ येत चालला आहे. त्यापार्श्वभुमिवर जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांची व्याप्ती वाढवून मतदार जनजागृतीवर भर द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

स्वीप उपक्रमांबाबत आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावाग घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, अंकुश पांढरे, स्वप्निल सरदार, जयश्री चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध माध्यमांद्वारे उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांना अधिक गति देण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत त्यांच्या जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या पत्र, देयके, पावत्या इ. वर  मतदार जनजागृतीपर संदेश प्रसिद्ध करावे. त्यात विज वितरण कंपनी, मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत इ. तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक  अशा गर्दिच्या ठिकाणांचाही वापर केला जावा. सिनेमागृहे तसेच अन्य माध्यमांचा वापर करुन, जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी प्रभात फेऱ्यांच्या आयोजन करुन वातावरण निर्मिती करावी,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा