डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज(दि.१४)व्याख्यान
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त रविवार दि.१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. जयदेव डोळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होणार असून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व प्रबळ लोकशाही करीता मतदानाचे महत्त्व’, या विषयावर डॉ. डोळे हे आपले विचार मांडतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे राहणार असून अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment