डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment