जिल्ह्यात आता ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार

 छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ साठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत (दि.२५) ही यादी अद्यावत केली जाते. त्यानुसार, ही यादी जाहीर करण्यात आली. आता अद्यावत यादीनुसार जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार मतदानात भाग घेतील, अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.

            जिल्ह्यातील मतदार यादीत १६ लाख ६ हजार ६१३ पुरुष, १४ लाख ५८ हजार ३८१ महिला तर १४० इतर  तसेच २५७३ सर्व्हिस मतदार असे एकूण ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार समाविष्ट आहेत.

 

विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार संख्या याप्रमाणे-

१०४ सिल्लोड- पुरुष १ लाख ७९ हजार १७, महिला १ लाख ६० हजार८२६, इतर ४, सर्व्हिस मतदार ५७७

१०६ फुलंब्री- पुरुष १ लाख ८४ हजार ९८५, महिला १ लाख ६६ हजार ८१९, इतर ४, सर्व्हिस मतदार ३५३

११० पैठण- पुरुष १ लाख ६४ हजार ८०२, महिला १ लाख ४८ हजार ९६३, इतर ४, सर्व्हिस मतदार १३४

१०५ कन्नड- पुरष १ लाख ७१ हजार ६८, महिला १ लाख ५३ हजार ९९५, इतर ९, सर्व्हिस मतदार ५६५

१०७ औरंगाबाद (मध्य)- पुरुष १ लाख ८० हजार ३५६, महिला १ लाख ६९ हजार ७९०, इतर ५, सर्व्हिस मतदार १०१.

१०८ औरंगाबाद (पश्चिम)- पुरुष २ लाख ५ हजार ९०, महिला १ लाख ८४ हजार ६८, इतर ७७,  सर्व्हिस मतदार १४१.

१०९ औरंगाबाद (पूर्व)- पुरुष १ लाख ७६ हजार ६८१,  महिला १ लाख ६१ हजार ४१९, इतर १३, सर्व्हिस मतदार ५१.

१११ गंगापूर-पुरुष १ लाख ८२ हजार २६८, महिला १ लाख ६४ हजार ८३२, इतर २२, सर्व्हिस मतदार २८९.

  पुरुष १ लाख ६२ हजार ३४६, महिला १ लाख ४७ हजार ६६९, इतर २, सर्व्हिस मतदार ३६३.

           छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा १८ जालना लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तीन विधानसभा क्षेत्रातील एकत्रित मतदार संख्या याप्रमाणे- पुरुष५ लाख २८ हजार ८०४, महिला ४ लाख ७६ हजार ६०८, इतर १२ सर्व्हिस मतदार १०६३  असे एकूण १० लक्ष ६ हजार ४८७.

           तर १९- औरंगाबाद मतदार संघात समाविष्ट अन्य सहा विधानसभा क्षेत्रातील एकत्रित मतदार संख्या याप्रमाणे- पुरुष १० लाख ७७ हजार ८०९, महिला ९ लाख ८१ हजार ७७३ इतर १२८ सर्व्हिस मतदार १५१० असे एकूण २० लाख ६१ हजार २२०  इतके मतदार आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा