जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान

 छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दि.६ मे ते १३ मे या कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १२९, १३३, १४३ व १४र चे अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील १०४- सिल्लोड, १०५- कन्नड, १०६-फुलंब्री, १०७- औरंगाबाद मध्य, १०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व, ११०-पैठण,१११- गंगापूर ११२-वैजापूर विधानसभा मतदारसंघनिहाय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कामासाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना हे अधिकार प्रदान करण्यात आले असून दि.६ मे च्या सायं.६ वाजेपासून ते दि.१३ मे २०२४ पर्यंतच्याकालावधीसाठी हे आदेश लागू राहतील असेही आदेशात म्हटले आहे.

०००००

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा