मतदार चिठ्ठ्या वाटपास प्रारंभ

 छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने येत्या दि.१३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांना आपले मतदानाचे केंद्र , यादीतील क्रमांक इ. ची माहिती असलेली मतदार चिठ्ठी  वाटपास आजपासून प्रारंभ झाला अशी माहिती सहा. नोडल अधिकारी अविनाश अंकूश यांनी दिली,

           छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार चिठ्ठ्यांचे वितरण होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक इ. माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार चिठ्ठ्या (Voter Information Slip) दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठ्या त्या त्या भागात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वितरीत होणार आहेत.  मतदारांनी आपापल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय  अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपली मतदार चिठ्ठी प्राप्त करुन घ्यावी व सोमवार दि.१३ मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा