जिल्हाधिकारी स्वामी यांचे सपत्निक मतदान
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ साठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघ दिलीप स्वामी यांनी आज त्यांच्या सुविद्य पत्नी करुणा यांच्या सह मतदान केले. मतदान केंद्र क्रमांक १६९ येथे जाऊन त्यांनी मतदान केले.
निवडणूक आयोगाचे स्वीप नोडल संतोष अजमेरा यांचे मतदान
भारत निवडणूक आयोगाचे स्वीप नोडल अधिकारी संतोष अजमेरा यांनी आज शहरातील संत
मीरा विद्यालयात सपत्निक आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदार जनजागृती सदिच्छा दूत श्रीमती नवेली देशमुख
यांनीही आपला मतदानाचा हक्क किलबिल शाळा येथील
मतदान केंद्र क्रमांक २५९ येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
०००००
Comments
Post a Comment