निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांना तातडीचे वैद्यकीय उपचार, कॅशलेस सुविधाही उपलब्ध; मनपाच्या वैद्यकीय पथकांनी केले २११ जणांवर उपचार
छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही प्रशासन पुरती काळजी घेत आहे. महापालिकेने स्थापन केलेल्या वैद्यकीय सुविधा केंद्रांवर आता पर्यंत १०६- फुलंब्री, १०७ औरंगाबाद मध्ये, १०८ औरंगाबाद पश्चिम व १०९ औरंगाबाद पूर्व अशा चार विधानसभा क्षेत्रातील एकूण २११ अधिकारी कर्मचाऱ्यांवर उपचार करुन त्यांची प्रकृती उत्तम केली आहे, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
निवडणूक कर्तव्यावर असतांना नियुक्त कर्मचारी
अधिकाऱ्यांना प्रकृती बिघाडाचा त्रास झाल्यास त्यांचेवर तात्काळ वैद्यकीय उपचार होण्याच्या
दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात मनपा आरोग्य
विभागाने नियोजन केले आहे. मनपाचे ४० दवाखाने व त्यातील कर्मचारी तर सज्ज आहेतच त्याशिवाय मनपा कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार विधानसभा क्षेत्रानिहाय
सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात २४x७ वैद्यकीय्कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्या कक्षात १ वैद्यकिय अधिकारी व ४ कर्मचारी असे ५ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच शहरात २३ रुग्णवाहिका
कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
१०७ औरंगाबाद (मध्य) १४८, १०८ औरंगाबाद
(पश्चिम) मध्ये २२ व १०९ औरंगाबाद (पूर् )मध्ये
४१ अशा एकून २११ कर्मचारी अधिकारी यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यात १८८ पुरुष तर
२३ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांणा वाढत्या तापमानामुळे होणारे
आजार झाले होते. त्यात संग्रहणी, अस्वस्थपणा,
डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा मळमळ होणे इ. आजार झाले. त्यांचेवर उपचार करण्यात आले.
आता हे कर्मचारी स्वस्थ आहेत,असेही डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
काल (दि.१०) रात्री आठ वा. निवडणूक कर्तव्यावर
असणाऱ्या श्रीमती अनुषा मूर्ती यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल करुन उपचार सुरु केले.
हे उपचार कॅशलेस करण्यात आले. आता सध्या त्यांची तब्येत व्य्वस्थित असल्याचे सांगण्यात
आले.
००००००




Comments
Post a Comment