मासिक पाळी स्वच्छ दिनाचे महत्त्व
जागतिक मासिक पाळी दिन दरवर्षी २८ मे रोजी साजरा केला जातो महिला व मुलींना मासिक पाळीचे व स्वच्छतेचे महत्त्व सांगून आरोग्य शिक्षण देऊन आजारांपासून प्रतिबंध व आरोग्याचे समर्थन करणे, संवर्धन करणे, जनजागृती करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे आपल्याकडे ५० टक्के पेक्षा अधिक मुली व महिलांना मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात. याबाबत अधिक माहिती करुन देणारा हा लेख-
स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो
रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual
cycle/ एमसी) असे म्हणतात.
मासिक पाळी किती
दिवसांनी येते?
महिलांना दर महिन्याला
मासिक पाळी येते. सामान्यतः मासिक पाळी २८ दिवसांची असते. याचा अर्थ कालावधीच्या पहिल्या दिवसापासून पुढील कालावधीच्या
पहिल्या दिवसापर्यंत अंदाजे २८ दिवस. २८ दिवस ही सरासरी संख्या आहे, परंतु ती २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान असणे देखील सामान्य आहे. मुलीला एक किंवा दोन वर्षे
अनियमित मासिक पाळी येणे सामान्य आहे.
सन २०२४ चे मासिक पाळी स्वच्छता यावर्षीचे जागतिक घोष
वाक्य: "Together for a Period Friendly World" असे आहे मासिक पाळी आणि त्यासंदर्भातील स्वच्छता
याविषयी जागरूकता निर्माण करण हा त्यामागचा हेतू आहे महत्त्वाच्या बाबीवर महिला व
मुलींना मासिक पाळीत व्यवस्थापन कसे करावे याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी
आरोग्य शिक्षण देणे महत्त्वाचे ठरते.
मासिक पाळी या विषयावर गैरसमज व समाजातील जुन्या
परंपरागत रुढी परंपरा यातून अनेक सामाजिक व आरोग्य विषयक प्रश्न दूर करणे
महत्त्वाचे ठरते
-शालेय
शिक्षणापासूनच मुलींना होणारे बदल व त्याचा स्वीकार याविषयी आरोग्य शिक्षण देणे
गरजेचे आहे
-मासिक पाळीची
सुरुवात ही एक नैसर्गिक क्रिया आहे, मुलींमधील भीतीचे व त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे
आवश्यक
आहे
-शारीरिक मानसिक व
भावनिक बदलांविषयी मुलींमध्ये जनजागृती व्हावी
-मासिक पाळीतील
स्वच्छता सॅनिटरी पॅड चा उपयोग व घरगुती वापरण्यात येणाऱ्या कपडी घडया योग्य
निर्जंतुकीकरण व हाताळणे व याबाबत आरोग्य शिक्षण द्यावे
-मुलींमध्ये होणारे
किरकोळ त्रास आहार,विश्रांती व्यायाम याविषयी माहिती देण्यात यावी.
मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी -
स्वच्छतेची काळजी घ्यावी. मासिक पाळीच्या काळात संसर्ग
व्हायचा धोका वाढतो, त्यामुळे या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली
पाहिजे. दररोज आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत आणि सॅनिटरी नॅपकिन्स काही
तासांनी बदलत रहावे. योग्य आहार घ्यावा.
मासिक पाळी स्वच्छता देणे महत्त्वाचे का?
गर्भाशयाचे कर्करोगाचा आजार व प्रजनन संस्थांचे आजार
यापासून प्रतिबंधक महत्त्वाचा ठरतो
मासिक पाळी विषयी आरोग्य शिक्षणातून मुलींमध्ये भावनिक
आरोग्य विषयक सशक्तपणा निर्माण होतो.
मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने आरोग्य शिक्षण व चर्चा झाल्यास मुलींच्या शंकांचे समाधान होते
सामाजिक व आर्थिक लाभ प्राप्त होतो.
मुलींमध्ये होणारे
रक्तक्षयाचा प्रतिबंध गोळ्याचे वाटप करून
भविष्याची निरोगी माता व निरोगी पिढी बनविण्यास मदत होते,अशी माहिती डॉ. अभय
धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली
आहे.

Comments
Post a Comment