प्रतिबंधात्मक आदेश जारी
छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- लोकसभा निव्डणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात सोमवार दि.१३ रोजी मतदान होणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक प्रक्रिया विना अडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोक एकत्र येणे.( भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडीत कर्मचारी व मतदान कक्षाबाहेर मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळून), मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात मोबाईल फोन , कॉर्डलेस फोन, लाऊड स्पिकर, वायरलेस सेट अथवा मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे, मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी, इतर प्रतिनिधी यांनी मतदान्केंद्रात मोबाईल वापरणे, चित्रीकरण करणे, शस्त्र बाळगणेपरवानगी दिलेल्या व्यतिरिक्त वाहनांचा वापर करणे, मतदारांची ने आण करणे, निवडणूक विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकावणे, ठरविक उमेदवारालाच मतदान करण्याविषयी दबाव टाकणे, मतदानाचा हक्क बजावू नये यासाठी दबाव टाकणे, १०० मीटर परिसरात ज्वलनशील पदार्थ, स्फोटक पदार्थ , हत्यारे, मतदान यंत्राला हानी पोहोचू शकेल अशी कोणतीही वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचा भंग केल्यास ती व्यक्ती शिक्षेस पात्र असेल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment