सोमवारपासून (दि.६) रेल्वेस्थानकावर चित्रप्रदर्शनाद्वारे मतदार जनजागृती
छत्रपती संभाजीनगर, दि.५ (जिमाका):- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो द्वारा तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या सहयोगाने छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक येथे सोमवार दि.६ ते बुधवार दि.८ दरम्यान मतदार जनजागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार दि.६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे. सोमवार दि.६ ते बुधवार दि.८ या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन मोफत खुले राहणार आहे. तरी या चित्रप्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment