राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान उद्योग संस्थेच्या संचालकांची आजपासून (दि.१७) दोन दिवसीय सभा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):-  राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक व सुचना उद्योग संस्थेच्या (National Institute of Electronics and Information Technology) छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रात शुक्रवार दि.१७ व शनिवार दि.१८ रोजी देशभरातील विविध केंद्र संचालकांची सभा होणार आहे.

            भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असणारी ही एक स्वायत्त संस्था आहे. संस्थेचे देशभरात अनेक केंद्र आहेत. छत्रपती संभाजीनगर येथेही त्यापैकी एक आहे. अशा या विविध केंद्रसंचालकांची २७ वी सभा, संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे.या सभेस सचिव एस. कृष्णन, महासंचालक डॉ. मदन मोहन त्रिपाठी व अन्य संचालक उपस्थित असतील. या बैठकीत देशभरातील विविध केंद्रांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात येईल असे संयोजक सौरभ बनसोड यांनी कळविले आहे.

०००००


 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा