मतदार जनजागृतीसाठी रेल्वेस्थानकावर दि. ६ ते ८ चित्रप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीने सोमवार दि.६ पासून छत्रपतीसंभजीनगर रेल्वेस्थानक येथे मतदार जनजागृतीसाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.६ रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनास सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि.८ पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे,असे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment