डेंग्यू ताप टाळण्यासाठी खबरदारी घ्या-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका):- डेंग्यू ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादी मार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते.कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय
डेंग्यु दिन गुरुवार १६ मे रोजी साजरा होत आहे.
डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या
मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा.
सिंमेट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या
कुंडया, निरपयोगी वस्तू, टायर्स व कुलर ईत्यादी. जास्त दिवस साठलेल्या ठिकाणी एडिस
इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालते व यातून
या डासाचा मोठा फैलाव होतो.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांची डेंग्युची परिस्थिती
पुढीलप्रमाणे आढळते.
वर्ष बाधीत
रुग्ण
सन 2019 - 527
सन 2020 - 48
सन 2021 - 117
सन 2022 - 108
सन 2023 - 415
30 एप्रिल 2024 अखेर 24
नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार
नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून
दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर
यांनी केले आहे.
डेंग्यु
संदर्भात India Fights Dengu हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार केलेले आहे. त्याच प्रमाणे
अॅन्ड्राईड मोबाईलवर PLAY STORE मध्ये जावुन India Fights Dengu हे अॅप शोधावे व मोबाईलवर
ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यु विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी सांगितले की, डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा
एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळं घरात एसी,
फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्याकडे
विशेष लक्ष ठेवा. तिथे खूप दिवस पाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्या. घरात आणि आजूबाजूला
स्वच्छता पाळणं सर्वांत महत्त्वाचं. डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे
तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावच. घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे,
शक्यतो दारं-खिडक्या बंद ठेवणे, आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना
करणे आवश्यक आहे.
००००००
Comments
Post a Comment