टपाली मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र
छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चौथ्या टप्प्यामधील १९- औरंगाबाद व्यतिरिक्त एकूण १० मतदार संघातील प्राप्त बॅलेट पेपर म्हणजेच टपाली मतपत्रिका जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. टपाली मतदानाची प्रक्रिया दि.६, ७ व ८ या दिवशी होणार आहे. टपाली मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र तयार केले आहे. संबंधित पात्र मतदारांना येथे येऊन ओळखपत्रासह ओळख पटवून आपले मतदान करता येईल. याकरिता एकूण चार सुविधा केंद्र भूसंपादन विभागात स्थापन केले आहेत. सर्व पात्र मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment