जिल्हा वार्षिक योजनेतून करावयाच्या कामांचे नियोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.१० (जिमाका)- जिल्हा वार्षिक योजनेतून विविध अंमलबजावणी यंत्रणांमार्फत करावयाच्या कामांचे नियोजन करुन गुणवत्तापूर्ण दर्जेदार कामे विहित वेळेत पूर्ण करा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व यंत्रणाप्रमुखांना दिले.
जिल्हा
नियोजन समिती सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजना
(सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, अनुसूचित जमाती उपयोजना) अंतर्गत विविध योजनांची
अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागप्रमुखांची बैठक आज आयोजित करण्यात आली. पोलीस
उपायुक्त संदीप पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, सहा. आयुक्त समाज कल्याण
पांडुरंग वाबळे, प्रकल्प संचालक आदिवासी विकास
विभाग बोकाडे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
प्रलंबित
दायित्व निधी व मंजूर कामांच्या प्रगतीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. कामे वेळेत
पूर्ण करणे, कामे करतांना ती गुणवत्तापूर्ण असणे याबाबत संबंधित विभागप्रमुखांना निर्देश
देण्यात आले.
जिल्हाधिकारी
स्वामी म्हणाले की, प्रलंबित कामे पूर्ण करतांना दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव पाठवावे.
जेणे करुन वेळेत कामे करता येतील. त्यासाठी नियोजन करावे. ज्यांचे कामे पूर्ण होऊन
निधी विनियोग झाला असेल अशा यंत्रणांनी उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर करावे. नियोजन
विभागाने विकसित केलेल्या ऑनलाईन प्रक्रिया प्रणालीचा सर्वंकष वापर करण्यासाठी अधिकारी-
कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशी सुचनाही त्यांनी नियोजन विभागाला केली.
यासोबतच सर्व यंत्रणांनी जलसमृद्ध गाव अभियान तसेच आता पावसाळ्यात वृक्ष लागवडीचेही
नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
०००००
Comments
Post a Comment