बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी तीन कत्तलखान्यांना परवानगी

  छत्रपती संभाजीनगर दि.१२(जिमाका)- बकरी ईद या सणानिमित्त शहरातील तीन अधिकृत कत्तलखान्यांमध्ये कुर्बानीसाठी परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३३१(१) (२) व ३७८ (१)(क) चार अन्वये हे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ अन्वये (सुधारीत) १९९५ अन्वये बकरी ईद या सणानिमित्त अधिकृत कत्तलखान्यास सकाळी ८ ते दुपारी २ यावेळात चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. कत्तलखाने व परवानगी कालावधी याप्रमाणे-

१.      रविवार दि.१६- प्रभाग क्रमांक ९ दाऊदी बोहरा जमात अंजुमन ए सैफी, बोहरा कब्रस्थान, दाऊदपुरा पाटीदार भवनाच्या मागे जालना रोड.

२.      सोमवार दि.१७- प्रभाग क्रमांक १ पडेगाव कत्तलखाना मनपा

३.      सोमवार दि.१७- प्रभाग क्रमांक ३ शहाबाजार कत्तलखाना मनपा.

वरील प्रमाणे अधिकृत कत्तलखान्यात परवानगी दिलेल्या कालावधी व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही उघड्यावर किंवा इतरत्र जनावरांची कत्तल करु नये. उघड्यावर मांस वाहतुक करु नये. विशिष्ट कालावधी करीता ही परवानगी असली तरी  नियमितपणे चालविण्याच्या कत्तलखान्याचे सर्व नियम, अटी व शर्ती त्यासाठी लागू राहतील,असेही मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा