महिला लोकशाही दिन मंगळवारी (दि.१८)
छत्रपती संभाजीनगर दि.१३(जिमाका)- महिलांचे प्रश्न मांडता यावेत यासाठी तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, जून महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दि.१७ रोजी सार्वजनिक सुटी असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दि.१८ रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन सकाळ ११ ते १२ वाजे दरम्यान करण्यात आले आहे. समस्याग्रस्त पिडीत महिलांनी त्यांचे प्रश्न, तक्रारी यावेळी दोन प्रतित दाखल करावे. तक्रारी अर्ज हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. निवेदन दोन प्रतित सादर करावे. प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे. तसेच सेवा, आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाही. तरी महिलांनी आपले तक्रारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment