अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील घेणार गुरुवारी (दि.२०) आढावा बैठक
छत्रपती संभाजीनगर दि.१८(जिमाका)- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यान्वित व्याज परतावा योजनांचा तालुका व जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवार दि.२० रोजी आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कार्यालयामार्फत कळविण्यात आले
आहे की, महामंडळाच्या योजनांमार्फत आतापर्यंत राज्यामध्ये ९२ हजार १४४ लाभार्थ्यांना
विविध बॅंकांनी ७३३० कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे. महामंडळाने ७६८ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज
परतावा लाभार्थ्यांना केला आहे. छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात आतापर्यंत ८६०३ लाभार्थ्यांना विविध बॅंकांनी ६५० कोटी रुपयांचे व्यावसायिक
कर्ज वितरीत केले आहे. तसेच महामंडळाने आतापर्यंत
७३ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा लाभार्थ्यांना केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष
नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे व्यक्तिशः योजनांतर्गत लाभार्थ्यांना असलेल्या अडचणींचा
आढावा घेण्यासाठी बैठक घेत आहेत. लाभार्थ्यांना अडचण असल्यास दि.२० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी
साडेअकरा वा. उपस्थित रहावे असेआवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment