शासकीय वाहनाचा लिलाव

 छत्रपती संभाजीनगर दि.६(जिमाका)- नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर यांचेकडील ॲम्बेसिडर कार एमएच १२ एएच ७६४८ हे वाहन निकामी करण्यात आले आहे. या वाहनाचा ‘जेथे आहे तेथे व जसे आहे तसे’, या तत्त्वावर विक्री करावयाची आहे. त्यासाठी वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्या व्यक्ती/ संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी आपल्या निविदा बंद लिफाफ्यात दि.१३ जून रोजी सायं.४ वा. पर्यंत नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर येथे द्याव्यात. या निविदा शुक्रवार दि.१४ जून रोजी सकाळी ११ वाजता  तेथेच उघडण्यात येतील. अटी शर्ती व अधिक माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर कार्यालयात उपलब्ध आहेत असे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर यांनी कळविले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा