जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिकांसाठी पदभरती
छत्रपती संभाजीनगर दि.१४(जिमाका)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर बाह्ययंत्रणेद्वारे लिपिक/ टंकलेखक पदासाठी भरती होणार असून माजी सैनिक उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रता- मराठी
व इंग्रजी टायपिंग, ड्राफ्टींग, अकाऊंट, कॅशबुक हाताळण्याचा अनुभव, शारिरीकदृष्ट्या
सुदृढ, सैन्यदलातून लिपीक पदावरुन निवृत्त माजी सैनिकांना प्राधान्य. इच्छुक उमेदवारांनी
मुळ कागदपत्रांसह गुरुवार दि.२० जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा रोड, छत्रपती संभाजीनगर (संपर्क २४०-२३७०३१३) येथे उपस्थित
रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment