छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबीर शुक्रवारी (दि.२१)

 छत्रपती संभाजीनगर दि.१८(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) तर्फे शुक्रवार दि.२१ रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा यावेळात तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात विविध तज्ज्ञ व्यक्तींमार्फत इयत्ता १० वी व १२ वी नंतर काय? भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नविन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी इ. बाबत मागदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासनाच्या योजना, बँक, वित्तीय संस्था, स्वंयरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन देणारी शासनाची महामंडळे, आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांचेकडील योजनांची माहिती देण्यात येणार आहे. हे शिबिर विनाशुल्क असून सर्व महाविद्यालयांचे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची)  चे प्राचार्य पंडित म्हस्के  यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा