अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश सुरु

  छत्रपती संभाजीनगर दि.१२(जिमाका)- शालेय प्रवर्ग, इयत्ता १० वी, १२ व तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव, आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी  शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु झाले आहेत,असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे. जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांचे शासकीय वसतीगृह, किलेअर्क, तर मुलींसाठी १००० मुलींचे शासकीय वसतीगृह, पदमपुरा युनिट ४ या वसतीगृहात तसेच तालुकास्तरीय  शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु आहेत. त्यासाठी त्या त्या शासकीय वसतीगृहात जाऊन अर्ज भरावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा