राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात ‘मॉडेल मैत्री क्लिनिक’चे उद्घाटन’


छत्रपती संभाजीनगर दि.१९(जिमाका)-
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हा रुग्णालयात ‘मॉडेल मैत्री क्लिनिक’चे आज उद्घाटन  करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, डॉ. अश्विन पाटील, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक अक्रूर सोळुंके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विनायक मुंडे, जिल्हा आर.के.एस.के.समन्वयक पांडुरंग आवचार, जिल्हा रुग्णालय स्तरावरील सर्व जिल्हा कार्यक्रम समन्वयक व तालुकास्तरीय आर. के. एस. के. समन्वयक उपस्थित होते.

            मॉडेल मैत्री क्लिनिक स्थापन करण्यामागे  किशोर वयीन मुला मुलींच्या प्रजनन व लैंगिक आरोग्यामध्ये सुधारणा करणे हा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १० ते १९ वर्ष वयोगटातील जिल्हयातील सर्व मुला, मुलींना आरोग्य विषयक सल्ला व उपचार सेवा दिला जातो. एकुण लोकसंख्येच्या २२ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन मुला, मुलींची असते. किशोर अवस्थेमध्ये प्रजजन व लैंगिक आरोग्य व पोषण आहार, मानसिक आरोग्य व हिंसा, व्यसनाधिनता व असंसर्गजन्य आजार या सहा विषयांचा या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समावेश होते. या अंतर्गत जवळपास एकुण ५१ प्रा.आ.केंद्र, १० ग्रामीण रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालय स्तरावर मैत्री क्लिनिक स्थापन करण्यात आले आहे.

            या क्लिनिक द्वारे खालील आरोग्य सेवा पुरविल्या जातात.

१. किशोर वयीन मुलींना दरआठवडयाला एक या प्रमाणे लोहाच्या गोळयांचे वाटप होते.

२. किशोर वयीन मुलींना मासिक पाळीमध्ये स्वच्छते विषयी मार्गदर्शन व अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात येते.

३. तसेच किशोरवयीन मुला, मुलीची माहीती ही गोपनिय स्वरुपात ठेवली जाते

४. काही स्वरुपात संदर्भ सेवा ही दिली जाते.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा