सैनिकी मुलामुलींचे वसतीगृह, कारगिल स्मृतीवन, सैनिकी विश्रामगृह येथे माजी सैनिकांसाठी पदभरती

  छत्रपती संभाजीनगर दि.१४(जिमाका)- सैनिकी मुलामुलींच्या वसतीगृह कारगिल स्मृतीवन व सैनिकी विश्रामगृह येथे विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती आयोजित केली असून माजी सैनिक, माजी सैनिक विधवा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

            सैनिकी मुला- मुलींचे वसतीगृह येथे सहाय्यक वसतीगृह अधीक्षक-१ पद, सहाय्यक वसतीगृह अधीक्षक (महिला उमेदवार-मुलींच्या वसतीगृहासाठी)-१ पद, चौकीदार-२ पद. सफाई कामगार-२ पद, स्वयंपाकी-५ पद, माळी कामगार-२ पद.

            सैनिकी विश्रामगृह येथे चौकीदार- १ पद, सफाई कामगार-१ पद,  कारगिल स्मृतीव येथे माळी कामगार १ पद.

पात्रता- उमेदवार माजी सैनिक/ सैनिक विधवा असावे. शारिरीकदृष्ट्या सक्षम, सर्व पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.

सोबत जोडावयाची कागदपत्रे -वैयक्तिक अर्ज, आधार कार्ड, रहिवासी दाखला, पी.पी.ओ. पासबुक, डिस्चार्ज बुक.

            वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गुरुवार दि.२० जून रोजी सकाळी ११ वा. मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. माजी सैनिक/ सैनिक विधवा यांच्यातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर नागरिक उमेदवारांमधून पदे भरण्यात येतील,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

            अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा रोड, छत्रपती संभाजीनगर (संपर्क २४०-२३७०३१३) येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा