परदेशात उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर दि.१८(जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी  मिळावी, या हेतुने राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ७५विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात QS World University Ranking २०० च्या आत रँकिग असलेल्या विद्यापीठात पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका व पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांच्या पालकांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. या योजनेचा तपशिल, अर्जाचा नमुना व इतर आवश्यक माहिती www.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी पात्र विद्यार्थ्यांकडून दि.१२ जुलै पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण  पी.जी.वाबळे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा