जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि.१४(जिमाका)- जिल्हा ग्रंथालय अधिकाई कार्यालयाच्या वतीने ग्रंथालय व अभ्यासिकेची विनामूल्य सोय आहे. तथापि, ग्रंथ घरी घेऊन जाऊन वाचन करण्यासाठी ग्रंथालयाचे सभासद होणे आवश्यक असून वाचनप्रेमी नागरिकांनी सभासद व्हावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. धों.साबळे यांनी केले आहे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हे २६, ग्रंथालय सदन, राधामोहन कॉलनी, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे असून तेथे ग्रंथालय व अभ्यासिका सुविधा विनामूल्य आहे. या ग्रंथालयात विविध विषयांवरील दर्जेदार असे १७ हजारांपेक्षा अधिक ग्रंथसंपदा असून दैनिके, नियतकालिके व इतर वाचनसाहित्यही वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येते. तथापि, ग्रंथ घरी नेण्यासाठी जिल्हा ग्रंथालयाचे वैयक्तिक सभासद होणे आवश्यक आहे. त्यासाठी अनामत रक्कम ५०० रुपये (परतावा) अर्ज व प्रवेश शुल्क ११० रुपये(द्विवार्षिक) तसेच संस्था सभासद होण्यासाठी अनामत रक्कम २५०० रुपये (परतावा) व अर्ज प्रवेश शुल्क ७७५ रुपये (द्विवार्षिक) इतके आहे. तरी नागरिकांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे व वाचन सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. धों. साबळे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment