राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर

 


     छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना होणारे अपघातात अवयव निकामी झाल्यास वा मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यात २०२४-२५ साठी आतापर्यंत ४९ प्रस्ताव दाखल असून सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

            जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसंदर्भात बैठक पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती अरुणा भुमकर आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यात प्राथमिक विभागाचे २४ व माध्यमिक विभागातील २२ व २० ऑटोबर २०२३ पूर्वीचे तीन असे एकूण ४९ प्रस्ताव आहेत. सर्व प्रकरणांची पडताळणी करुन प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आले. या सर्व प्रस्तावांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंजूरी देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा