पोलीस शिपाई भरती कालावधीत वाहतूक मार्गात बदल
छत्रपती संभाजीनगर दि.१८(जिमाका) – महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती पोलीस अधीक्षक, ग्रामीण आस्थापनेवरील एकूण १२६ पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता शेंद्रा ऑरिक डिएमआयसी परीसरातील लाडगाव द्वार (पाण्याच्या टाकीजवळील) सुनिल एंटरप्रायजेस या कंपनीपासून पूर्वेस एल.एम.के कंपनीच्या (लाडसावंगी कडे जाणारा चौक) चौफुली पर्यंतचा एक पदरी रोड हा पोलीस भरती शारिरीक चाचणी साठी दि.१७ ते ३० जून पर्यंत वापरण्यात येणार आहे. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु असतांना वाहने आल्यास भरती प्रक्रियेत व्यत्यय येणे अथवा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यासाठी या रोडवरील वाहतुक पूर्णपणे वळविण्यात आली आहे,असे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी निर्गमित केले आहेत.
बदललेला वाहतुक मार्ग या प्रमाणे-
पुर्वीचा जड वाहतूक
मार्ग शेंद्रा एमआयडीसी मधुन लाडसावंगी-दुधड-भांबर्डा-लवकी फाटा सुनिल एंटरप्रायजेस
कंपनीकडून एल.एम.के कंपनी कडे जाणारी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्ग शेंद्रा एम आय डी सी पर्कीन्स सुनिल एंटरप्रायजेस
कंपनी- लाडगाव डिएमआयडीसी प्रवेश द्वार (हॉटेल मोनिका) करमाड-लवकी फाटा मार्गे भांबर्डा-दुधड-लाडसावंगी
कडे जातील, असे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी कळविले आहे. हा बदल दि.१७ जून सकाळी
१० वाजेपासून ते ३० जून मध्यरात्री २४ वाजेपर्यंय्त
आहे,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment