आजी माजी सैनिकांच्या मुलींना नर्सिंग अभ्यासक्रमास प्रवेशाची संधी

  छत्रपती संभाजीनगर दि.१० (जिमाका)- भारतीय सैन्य दलातील आजी माजी सैनिक (भूदल, वायुसेना, नौसेना)  यांच्या मुलींसाठी जालंधर व गुवाहाटी येथील आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे प्रवेशाची संधी आहे,असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने कळविण्यात  आले आहे.  त्यासाठी दि.१५ जून रोजी प्रवेश चाचणी परीक्षा होणार आहे. आजी,माजी सैनिकांच्या  मुलींसाठी इयत्ता १२ वी उतीर्ण किमान ४५ टक्के गुण आणि प्रवेश चाचणी परीक्षा किमान ५०टक्के गुण मिळवून उत्तीर्ण  असल्यास प्रवेश मिळेल,असे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ,४१ नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर-४३१००२ (दूरध्वनी-०२४०-२३७०३१३) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा