एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर दि.१९(जिमाका)-  कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पिक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून या पिकांच्या  मूल्य साखळीस चालना देण्याच्या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन सन २०२२ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत.

1.      नॅनो युरिया सोयाबीन

2.      नॅनो डीएपी सोयाबीन

3.      नॅनो युरिया कापूस 

4.      नॅनो डीएपी कापूस

5.      मेटाल्डीहाइड-

 

या निविष्ठा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १२ जून पासून टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्याना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा