दिव्यांग व्यक्तिंच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना; इच्छुकांकडून अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर दि.१२(जिमाका)- दिव्यांग व्यक्तिंना स्वयंरोजगारासाठी उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येते. सन २०२४-२५ या वर्षाकरीता या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र दिव्यांग व्यक्तिंकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक व पात्र दिव्यांग व्यक्तिंनी दि.२२ जुलै पर्यंत आपले अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत
बॅंकेमार्फत दीड लाख रुपये कर्ज मंजूर केले जाते. त्यानंतर समाज कल्याण विभागामार्फत
२० टक्के सबसिडी दिली जाते. पात्र लाभार्थी- दिव्यांग प्रवर्गातील अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग. बौद्धिक अक्षम प्रवर्गातील
दिव्यांगास अर्ज करता येणार नाही. पात्र लाभार्थ्याचे वय १८ ते ५० वर्ष या दरम्यान
असावे. तहसिलदारांनी दिलेले मार्च २०२५ पर्यंत वैध असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवास
प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, ठराविक व्यवसायासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र, रेशन
कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र (UDID) ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक, दोन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे कोटेशन,
प्रकल्प अहवाल, जागे संदर्भात भाडे करार, पावती, मालकी हक्क पुरावे इ. जोडावे.
सर्व कागदपत्रे
जोडून आपले अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
येथे दि.२२ जुलै पर्यंत जमा करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. ओमप्रसाद
रामावत यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment