जिल्हा परिषद कृषी विभाग; योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि.२०(जिमाका)- जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व शेतमजूर,अल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
योजनांची
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-
१. डॉ.बाबासाहेब
आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
योजनेचे
स्वरुप- अनुसूचित जाती प्रवर्गातील
दीड लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर व
अनुषंगिक बाबींचा लाभ दिला जातो.
अटी व शर्ती- सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त जात प्रमाणपत्र, नविन विहिरीसाठी स्वतःच्या
नावे ०.४० हेक्टर जमिन, इतर लाभासाठी ०.२० हेक्टर जमीन, वार्षिक उत्पन्न दीड लाख
रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, ७/१२, ८ अ नमुना, आधार कार्ड, बॅंक पासबुक
च्या सत्यप्रती.
मिळणारे लाभाचे
प्रकार- नविन सिंचन विहीरीसाठी २
लाख ५० हजार रुपये
जुन्या विहिर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, वीज जोडणीसाठी १० हजार
रुपये.
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये.
ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार रुपये.
तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपये.
विद्युत पंप संचासाठी २० हजार रुपये
परसबागेसाठी ५०० रुपये.
२. बिरसा मुंडा कृषी
योजना
योजनेचे
स्वरुप- अनुसूचित जमाती प्रवर्गातील वार्षिक दीड लाख रुपये कमी उत्पन्न
असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर व अनुषंगिक बाबींचा लाभ दिला जातो
अटी व शर्ती- सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त जात प्रमाणपत्र, नविन विहिरीसाठी स्वतःच्या
नावे ०.४० हेक्टर जमिन, इतर लाभासाठी ०.२० हेक्टर जमीन, वार्षिक उत्पन्न दीड लाख
रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, ७/१२, ८ अ नमुना, आधार कार्ड, बॅंक पासबुक
च्या सत्यप्रती.
मिळणारे लाभाचे
प्रकार- नविन सिंचन विहीरीसाठी २
लाख ५० हजार रुपये
जुन्या विहिर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, वीज जोडणीसाठी १० हजार
रुपये.
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये.
ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार रुपये.
तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपये.
विद्युत पंप संचासाठी २० हजार रुपये
परसबागेसाठी ५०० रुपये.
पीव्हीसी पाईप साठी ३० हजार रुपये.
३. नवीन राष्ट्रीय
बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम
योजनेचे स्वरुप-
सर्व प्रवर्गातील शेतकरी, भुमिहीन शेतमजूर यांना
बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी अर्थसहाय्य केले जाते.
अटी शर्ती- सर्व प्रवर्गातील प्राधान्याने अत्यल्प, अल्प भूधारक, भुमिहीन
शेतमजूर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी. लाभार्थ्यांकडे
२-४ गाई, म्हशी, बैल इ. जनावरे असावीत. त्याबाबत ग्रामसेवक/ पशुधन पर्यवेक्षक
यांचे प्रमाणपत्र. बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी जागा असावी. ७/१२, ८ अ नमुना, आधार
कार्ड, बॅंक पासबुक च्या सत्यप्रती.
मिळणारे
लाभाचे प्रकार- सर्वसाधारण प्रवर्गास १४
हजार ३५० रुपये, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी २२ हजार रुपये , जिल्हा परिषद
उपकर अंतर्गत पूरक अनुदान ५ हजार रुपये प्रति घनमिटर.
संपर्क व
माहितीः- या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी
कृषी अधिकारी/ विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्याशी
संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment