शासकीय वाहनांचा लिलाव

  छत्रपती संभाजीनगर दि.१२(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालय. छत्रपती संभाजीनगर येथील जुने टाटा सुमो वाहन एमएच २० एएस२२२, एमएच २० एएस३३३, एमएच २० एएस४४४ या वाहनांचा  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ज्या स्थितीत आहे व जसे आहे त्याच स्थितीत या तत्वावर लिलाव पद्धतीने विक्री करावयाची आहेत.  या लिलावाबाबत सविस्तर माहिती, अटी शर्ती  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.aurangabad.nic.in  या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.तसेच ही माहिती सामान्य प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी  दि.१३ ते २० जून पर्यंत इच्छुकांना सहभाग  नोंदविता येईल. दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लिलाव घेण्यात येईल,असे उपजिल्हाधिकारी (सामन्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा